नायडूंच्या प्रकरणावर असं काही घडलंच नाही उद्यनराजेंचं स्पष्टीकरण | Udyanraje Bhosle | Sarkarnama |

2021-06-12 0

नवनिर्वाचित खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतल्यानंतर राज्यसभेचे सभापती वैंकय्या नायडूंनी केलेल्या टिप्पण्णीवर महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. वैंकय्या नायडू यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे. त्यावर उदयनराजेंना असा प्रकारच घडला नसल्याचे म्हटले आहे.

लॉकडाऊन लागू होण्याच्या वेळेसच महाराष्ट्रातील राज्यसभेची निवडणूक बिनविरोध झाली होती. मात्र इतर राज्यातील निवडणुका स्थगित झाल्या होत्या. परिणामी निवडणुकीची प्रक्रिया लांबल्याने महाराष्ट्रातून बिनविरोध राज्यसभेवर गेलेल्या सदस्यांना शपथविधीसाठी वाट पहावी लागली. काल या नवनिर्वाचित खासदारांचा राज्यसभेत शपथविधी झाला. ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रिय मंत्री रामदास आठवले, उदयनराजे भोसले, राजीव सातव आदींनी काल राज्यसभेचे सभापती वैंकय्या नायडू यांच्याकडून शपथ घेतली.

छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले उदयनराजे यांनी इंग्रजी भाषेतून शपथ घेतली. मूळ नमुन्यातील शपथ संपल्यानंतर त्यांनी 'जय महाराष्ट्र जय हिंद जय भवानी जय शिवाजी' असा घोष केला. त्यानंतर सभापती नायडू यांनी 'हे हाऊस नाही तर ते माझे चेंबर आहे. बाकीचे शब्द अभिलेखावर जाणार नाहीत' असे स्पष्ट करत ते (उदयनराजे) नवीन सदस्य आहेत, अशी टिप्पण्णी केली. या घटनाक्रमत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्याचा आरोप महाराष्ट्रातील अनेकांनी केलेला आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडीवर आहे. शिवसेना नेते, राज्यसभा खासदार संजय राऊत यांनीही शिवाजी महाराजांच्या वंशजांचा दिल्लीत अपमान झाला ते कोणी ठरवायचे, अशी तिरकस कमेंट केली आहे. दरम्यान, नायडू हे भाजपचे असल्याने भाजपवर जोरदार टीका सुरू आहे.

यापार्श्वभुमीवर उदयनराजे यांनी पत्रकार परिषद घेवून आपली भुमिका मांडली आहे. ते म्हणाले, राज्यघटनेत जेवढी शपथ आहे तेवढी घ्यावी लागते. माझी शपथ झाल्यावर त्याला काँग्रेसच्या काही सदस्यांनी आक्षेप घेतला. त्यावेळी सभापती व्यंकय्या नायडूंनी त्यांना थांबवलं आणि सांगितलं की, ''हे माझे चेंबर आहे. रेकॉर्डवर फक्त शपथ जाईल. बाकी काय जोडू नका''. शपथ राज्यघटनेला धरून नाही हा आक्षेप होता. त्याच्यावर वादविवाद होत आहेत. माझी सर्वांन?

Videos similaires